26 January 2020

News Flash

सलग चौथी दरकपात शक्य

रिझव्‍‌र्ह बँकेचे आज पतधोरण

(संग्रहित छायाचित्र)

महागाई स्थिरावत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदर कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बुधवारच्या बैठकीनंतर दुपापर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या सलग तीन द्विमासिक पतधोरणात प्रत्येकी पाव टक्का दर कपात केली आहे. यामुळे एकूण पाऊण टक्के दर कमी झाले आहेत; मात्र व्यापारी बँकांनी प्रत्यक्षात ०.२१ टक्के दर कपातीचाच लाभ कर्जदारांना देऊ केल्याची खंत खुद्द गर्वनरांनी व्यक्त केली होती.

रिझव्‍‌र्ह बँकेचे २०१९-२० चे तिसरे द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर होत आहे. त्यासाठीची पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून बँकेच्या मुंबई मुख्यालयात सुरू आहे. पतधोरण बुधवारी जाहीर होण्यापूर्वी काही व्यापारी बँकांनी त्यांचे ठेवींवरील व्याज कमी केले आहेत.

अर्थ-समालोचनाबाबत उत्सुकता

रिझव्‍‌र्ह बँकेकडून यंदा रेपो दरात पुन्हा पाव टक्क्यांची कपात रोखे बाजाराला अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेबाबत रिझव्‍‌र्ह बँकेची मते जाणून घेण्यात बाजाराला जास्त रस असून तूर्त महागाई पूर्णपणे नियंत्रणात असल्याने कुंठावस्थेतील अर्थव्यवस्थेत ऊर्जा आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक काय उपयोजना करते हे पाहावे लागेल. पुढील आठवडय़ात जून महिन्याचे औद्योगिक उत्पादनाचे आकडे उत्साहवर्धक नसतील, हे गृहीत धरूनदेखील आपला आधीचा विकास दर अंदाज किती कमी करते याकडे बाजाराचे लक्ष आहे. हा अंदाज खूपच खालावला तर रोख्यांच्या किमतीत नफावसुलीच्या रूपात घसरण होऊ शकते.

मर्झबान इराणी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, एलआयसी म्युच्युअल फंड

First Published on August 7, 2019 2:19 am

Web Title: reserve bank of indias credit rating today abn 97
Next Stories
1 आधीच्या ‘रेपो दर’कपातीचे लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचविण्याची बँकांकडून ग्वाही – अर्थमंत्रालयाकडून खुलासा
2 ‘लाँग टर्म’कडून ‘शॉर्ट टर्म’कडे संक्रमण
3 ३७० ‘कलम’ : उद्योगाकडून स्वागत
Just Now!
X