28 November 2020

News Flash

लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध

खात्यातून २५ हजार काढण्याची मुभा; ‘डीबीएस’बरोबर विलीनीकरण

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या सलग तीन वर्षांपासून तोटा नोंदविणाऱ्या व निव्वळ मालमत्ता रोडावलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध आले आहेत. ठेवीदारांना गरजेसाठी महिन्याभराकरिता २५ हजार रुपये काढण्याची मुभा मिळालेल्या बँकेचे डीबीएस या विदेशी बँकेबरोबरचे विलीनीकरण होणार आहे.

लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी सायंकाळपासूनच निर्बंध आणताना रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेच्या ठेवीदारांना येत्या १६ डिसेंबपर्यंत अत्यावश्यक म्हणून २५ हजार रुपये काढण्याची मुभा दिली. त्याचबरोबर सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या डीबीएस बँकेबरोबरचे तिचे विलीनीकरण महिन्याभरात पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

लक्ष्मी विलास बँकेबाबत मंगळवारी दोन स्वतंत्र निर्णय पत्रकांद्वारे जाहीर करत मध्यवर्ती बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे माजी बिगर कार्यकारी संचालक टी. एन. मनोहरन यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:18 am

Web Title: restricted on lakshmi vilas bank abn 97
Next Stories
1 … म्हणून एचडीएफसी बँक म्हणते, ‘मूह बंद रखो’
2 BPCL Privatisation: अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स,अरामकोची मात्र माघार
3 निर्देशांकांच्या उच्चांकी उसळीने नव्या संवत्सराचे स्वागत
Just Now!
X