पारंपरिक किराणा व्यवसायाला काही वर्षांपूर्वी हादरे देणाऱ्या किरकोळ विक्री क्षेत्रासमोर ई-कॉमर्स व्यासपीठाचे आव्हान उभे ठाकले असतानाच किरकोळ विक्री क्षेत्रात अचानक घडामोडींनी वेग घेतला. या मंचावरून वाढणारी कपडय़ांची अधिक खरेदी पाहता आदित्य बिर्ला समूहातील वस्त्र निर्मिती व विक्री क्षेत्रातील तीनही कंपन्या रविवारी एकत्र झाल्या. तर किरकोळ विक्री क्षेत्रातील फ्युचर समूह व भारती एन्टरप्राईजेस स्पर्धकांचा सामना करण्यासाठी एकत्र आले. याद्वारे टाटा – अंबानी यांना स्पर्धा देण्यासाठी बिर्ला – बियाणींची नवी खेळी खेळली गेली.
पॅन्टालून फॅशन अ‍ॅन्ड रिटेल
रु. १३६.६०(+१९.९३%)
आदित्य बिर्ला नुवो
रु. १,७६८.००(+१२.५९%)
फ्युचर रिटेल
रु. १२९.६५ (+१२.०६%)
फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स
रु. ८१.९५ (+६.०८%)
फ्युचर कन्झ्युमर एन्टरप्राईजेस
रु. १२.७० (+१२.०९%)