रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व मुख्य भागीदार बीपी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डुडले यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय तेल व वायूमंत्री वीरप्पा मोईली यांची भेट घेतली. यानंतर उभयतांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचीही भेट घेतलीे. कृष्णा गोदावरी खोऱ्यातील डी ६ या विहीर क्षेत्रात अधिक वायू उत्पादनासाठी ८ ते १० अब्ज डॉलर गुंतविणार असल्याचे कंपनीमार्फत भेटीत सांगण्यात आले. असे असले तरी कंपनीने अपेक्षित उत्पादन न झाल्यास बसणाऱ्या दुप्पट दंडाबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचेही समजते.