20 September 2020

News Flash

थकीत ‘मुद्रा’ कर्जाचा धोक्याचा स्तर

देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसाहाय्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरू करण्यात आली.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांकडून चिंता

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील थकीत कर्जे प्रमाणाबाहेर डोके वर काढत असतानाच, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत वितरीत कर्जाबाबतही  स्थिती धोक्याचे निशाण फडकवणारी आहे, असा चिंतेचा सूर खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेने आळवला आहे. वाढत्या थकित मुद्रा कर्जाबाबत तत्कालीन रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांनीही इशारा दिला होता.

देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसाहाय्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरू करण्यात आली. विद्यमान मोदी सरकारच्या पहिल्या पर्वाच्या प्रारंभीच किमान व्याजदरासह कमाल १० लाख रुपयांपर्यंतच्या वित्त साहाय्यासाठी ही योजना सुरू झाली. यामध्ये सरकारी बँकांसह क्षेत्रीय ग्रामीण बँका, लघू वित्त बँका, सहकारी बँका, सूक्ष्म वित्त संस्था तसेच बिगर बँकिंग वित्त संस्था सहभागी झाल्या.

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन यांनी मंगळवारी मुंबईत ‘सेबी’मार्फत आयोजित सूक्ष्मवित्त विषयावरील कार्यक्रमात सांगितले की, मुद्रा योजनेचा लाभ अनेकांना झाला. त्यामुळे छोटे उद्योजक, कारागिरांची आर्थिक स्थितीही सुधारली. मात्र मुद्रा कर्ज योजनेमुळे थकीत कर्जाचे प्रमाणही त्याच प्रमाणात वाढले आहे. बँकांनी या योजनेकरिता दिलेल्या कर्जाचा आढावा घेऊन परतफेड अर्थात वसुलीवर अधिक भर द्यावा, असेही जैन यांनी आवाहन केले.

आकडेवारीत विसंगती

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या नेमक्या बुडीत कर्जाच्या आकडेवारीबाबत कमालीची विसंगती आहे. जुलैमध्ये संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च २०१९ अखेर बुडीत मुद्रा कर्जे ३.२१ लाख कोटी रुपये झाली असून एकूण वितरीत कर्जाच्या तुलनेत ते प्रमाण २.६८ टक्के आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून माहिती अधिकारांतर्गत प्रश्नावर दिल्या गेलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये थकीत मुद्रा कर्जाचे प्रमाण वितरित कर्जाच्या तुलनेत १२६ टक्के वाढले आहे. आधीच्या वित्त वर्षांतील ७,२७७.३१ कोटी रुपयांच्या तुलनेत ते मार्च २०१९ अखेर १६,४८१.४५ कोटी रुपयांवर गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 1:24 am

Web Title: risk level of outstanding currency loan reserve bank akp 94
Next Stories
1 ऐतिहासिक उसळीनंतर शेअर बाजाराच्या सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
2 सुभाष चंद्र  यांचा ‘झी’चा राजीनामा
3 अपत्य असलेल्या कुटुंबियांकडून मुदतविम्याला मागणी
Just Now!
X