डीबीएस बँक इंडिया या एशियातील आघाडीच्या वित्तीय कंपनीने भारतातील पहिली खासगी सर्वसाधारण विमा कंपनी रॉयल सुंदरमबरोबर विमा उत्पादने विक्री करण्यासाठी सहकार्य करार केला आहे. डीबीएस बँकेच्या विविध शाखांमधून रॉयल सुंदरमची उत्पादने वितरित होतील.
या वेळी डीबीएस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य राहुल जोहरी यांनी सांगितले की, आमच्या १२ शाखांमधील आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करून देण्यावर आम्ही नेहमीच भर देत असतो. नवी व्यवसाय भागीदारी हा त्यातीलच एक पुढचे पाऊल आहे. रॉयल सुंदरम अलियान्स इन्शुरन्सचे व्यवस्थपकीय संचालक अजय िबभेट यांनी सांगितले की, कंपनीच्या एकूण व्यवसायापकी १३ ते १५ टक्के व्यवसाय हा बँकेश्युरन्सच्या माध्यमातून मिळतो. डीबीएस बँकेचे उच्च उत्पन्न गटातील ग्राहक आणि कंपन्यांमुळे ही भागीदारी अधिक सक्षम होऊ शकेल. बँकेश्युरन्स ही भारतीय जनरल इन्शुरन्स बाजारपेठेतील एक महत्त्वपूर्ण वितरण शृंखला असून त्याचे भारतीय जनरल इन्शुरन्सच्या व्यवसायात १५ टक्के योगदान आहे. भारतीय जनरल इन्शुरन्स बाजारपेठेचे एकूण ‘ग्रॉस रिटन प्रीमियम’ (जीडब्ल्यूपी) ७० हजार कोटी रुपये असून यामध्ये वर्षांला २० टक्क्यांची वाढ होत आहे. अधिकतर प्रमाणात या वेळी बँकांच्या शाखांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येऊन या माध्यमातून ४० कोटी बँक ग्राहकांना सेवा पुरवली जाते. २०१३ पासून विमा नियामकाने (आयआरडीए) कॉर्पोरेट एजंट्स म्हणून एक आयुर्वमिा व एक बिगरआयुर्वमिा कंपनीशी सहकार्य करार करण्याची मुभा दिली आहे.