पुढील महिन्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून बँकिंगशी निगडीत एका नियमामध्ये बदल होणार आहे. दरम्यान, या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे. पुढील महिन्यापासून रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कधीही पैसे पाठवता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४*७*३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.

RTGS द्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बँकांसाठी पैसे पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे. यापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरशी (NEFT) निगडीत नियमांत बदल करण्यात आला होता. गेल्या वर्षापासून ग्राहकांसाठी २४*७*३६५ ही सुविधा उपलब्ध आहे. NEFT द्वारे पाठवण्यात येणाऱ्या पैशांना किमान मर्यादा नाही. तसंच कमाल मर्यादा ही निरनिराळ्या बँकांवर अवलंबून आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rtgs service will available 24 hours all day from december 1 you can do anytime rtgs rule change neft changed before rbi jud
First published on: 24-11-2020 at 14:38 IST