पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेला पूरकता म्हणून, तसेच देशांतर्गत संरक्षण सामग्रीच्या निर्मितीबाबत स्वयंपूर्णतेच्या दृष्टीनेही रबर उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन रिअर अॅडमिरल आणि नौदलाच्या बंदरांचे अधीक्षक एस. पी. लाल यांनी केले.  भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआय आणि इंडियन रबर मॅन्युफॅक्चर्स रिसर्च असोसिएशन (आयआरएमआरए) यांच्याद्वारे संयुक्तपणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय रबर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना लाल यांनी भारतीय रबर उद्योग सध्या एका मोठय़ा वळणावरून प्रवास करीत असून, उज्ज्वल भविष्यकाळ खुणावत असल्याचे सांगितले.
हे ‘रबर वर्ल्ड एक्स्पो’ नावाचे प्रदर्शन गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात सुरू आहे.