21 October 2018

News Flash

सप्ताहात ६७ पैशांचे मूल्य-बळ

डॉलरच्या तुलनेत रुपया अडीच वर्षांच्या उच्चांकावर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

डॉलरच्या तुलनेत रुपया अडीच वर्षांच्या उच्चांकावर

गुरुवारच्या १२ पैशांच्या वाढीने स्थानिक चलनाने पुन्हा एकदा त्याचा गेल्या अडीच वर्षांच्या वरच्या टप्प्यावरील स्थान मिळविले. अवघ्या एका व्यवहाराच्या अंतराने डॉलरसमोर भक्कम बनलेला रुपया ६३.४१ पुढे राहिला.

परकी चलन विनिमय मंचावर रुपयातील तेजी एक सत्र वगळता गेल्या २८ डिसेंबरपासून कायम आहे. गेल्या गुरुवारी रुपया ६४.०८ पर्यंत होता. त्यानंतर त्यात मंगळवार, २ फेब्रुवारीपर्यंत भरच पडत होती. यावेळी त्याने त्याचा गेल्या अडीच वर्षांचा उच्चांक गाठला. त्या चार दिवसात रुपयात ६७ पैशांची भर पडली होती. बुधवारी अवघ्या ५ पैशांच्या घसरणीमुळे रुपया ६३.५३ पर्यंत खाली आला. मात्र गुरुवारी त्याने पुन्हा उसळी घेतल्याने त्याला आधीचा वरचा टप्पा पुन्हा गाठता आला.

या आधी १५ जुलै २०१५ रोजी रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य हे ६४ रुपयांखाली होते, त्यानंतर आता रुपयाने पुन्हा ६४ खाली फेर धरलेला दिसून येत असून, भारताच्या आयातीच्या दृष्टीने ही उपकारक बाब ठरली आहे.

First Published on January 5, 2018 1:38 am

Web Title: rupee edges closer to two and a half year high vs dollar