डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा ६४ च्या खालचा प्रवास नोंदवित रुपयाने विदेशी विनियम व्यासपीठावरील चिंता वाढविली. शुक्रवारच्या तुलनेत ३३ पैशांनी आपटत रुपया सोमवारअखेर ६४.०८ पर्यंत घसरला.
भारतीय चलनाचा हा गेल्या महिन्याभरातील सुमार प्रवास होता. यापूर्वी १२ मे २०१५ रोजी रुपया ६४.१७ पर्यंत घसरला आहे. सोमवारचा त्याचा प्रवास ६४.०० ते ६४.१६ दरम्यान राहिला. म्हणजेच चलन ६४ च्या वर गेलेच नाही. बँक आणि आयातदारांकडून अमेरिकी डॉलरला मागणी नोंदविली गेल्याने स्थानिक चलनावरील दबाव वाढला. याचा परिणाम भांडवली बाजारातही जाणवला.