28 January 2021

News Flash

रुपयात तब्बल २६ पैसे घसरण

चलनाचा हा गेल्या अडीच महिन्यांचा तळ होता.

डॉलरच्या तुलनेत सलगपणे घसरण नोंदविणाऱ्या रुपयाने मंगळवारी एकाच व्यवहारात आणखी २६ पैशांची आपटी नोंदविली. डॉलरसमोर मोठय़ा फरकाने कमकुवत होत स्थानिक चलन आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात ६७.७५ वर स्थिरावले. चलनाचा हा गेल्या अडीच महिन्यांचा तळ होता. रुपया यापूर्वी २००७ मध्ये एकाच व्यवहारात मोठय़ा फरकाने आपटला होता. महिनाअखेर तेल कंपन्यांकडून नोंदली जाणारी अमेरिकी चलन मागणी नोंदही रुपयाला अधिक कमकुवत करणारी ठरली. सोमवारी ६७.४९ वर बंद झालेल्या रुपयाने दुसऱ्या सत्राची सुरुवातही ६७.६३ या नरमाईनेच केली. सत्रात चलन ६७.५९ पर्यंतच वाढू शकले, तर व्यवहारादरम्यान त्याचा ६७.७७ हा तळ राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 8:15 am

Web Title: rupee free fall continues plunges 26 paise
Next Stories
1 विभाजित झालेला स्टरलाइट टेकचा विभाग दूरसंचार क्षेत्रात प्रवेशासाठी सज्ज
2 इंडियाफर्स्ट लाइफचे १०,००० कोटी मालमत्तेचे लक्ष्य
3 फिनो पेटेकचा विदेशात निधी हस्तांतरणासाठी थॉमस कुकसोबत करार
Just Now!
X