26 September 2020

News Flash

रुपयाची मुसंडी

सलगपणे सुरू असलेल्या पडझडीतून शुक्रवारी झालेल्या खरेदीमुळे सावरलेला भांडवली बाजार आणि निर्यातदारांकडून झालेली डॉलरची विक्री हे घटक चलन बाजारात भारतीय चलनाला मजबूती देणारे ठरले. रुपयाने

| June 15, 2013 12:07 pm

सलगपणे सुरू असलेल्या पडझडीतून शुक्रवारी झालेल्या खरेदीमुळे सावरलेला भांडवली बाजार आणि निर्यातदारांकडून झालेली डॉलरची विक्री हे घटक चलन बाजारात भारतीय चलनाला मजबूती देणारे ठरले. रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मुसंडी मारत आज ४७ पैशांनी कमाई केली आणि आठवडय़ापूर्वीचा ५७.५१ हा स्तर पुन्हा कमावला. रुपयातील घसरण ही तात्पुरती असून, तो गटांगळीतून सावरून पुन्हा मजबूत होईल, असे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी काल केलेल्या विधानाची सकारात्मकता आणि घटत्या महागाई दराने व्याजदर कपातीबाबत निर्माण झालेल्या शक्यतेने आज ‘सेन्सेक्स’ या मुख्य शेअर निर्देशांकात ३५० अंशांची उसळी दिसून आली. मुख्यत: विदेशी वित्तसंस्थांकडून बाजारात झालेल्या समभाग खरेदीचा परिणाम रुपयाला सावरण्यात झाल्याचे आज आढळून आले. तरी साप्ताहिक तत्त्वावर रुपया डॉलरच्या तुलनेत ४५ पैशांनी कमजोर बनला असून, ही रुपयाची सलग सहा आठवडय़ात सुरू राहिलेली घसरण आहे.
५७.५१ (+४७ पैसै)
५७.९८ (-१९पैसै) १३ जून

दरकपातीची शक्यता धूसरच!
घाऊक व किरकोळ किमतीवर आधारीत महागाईचा दर घसरत असला तरी, अर्थव्यवस्थेतील वाढीचा एप्रिलमध्ये नोंदविला गेलेला दशकातील नीचांक स्तर, रुपयाची घसरण आणि शोचनीय वित्तीय तूट लक्षात घेता रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा करता येत नाही.
* ज्योती वाधवानी, सह-अर्थतज्ज्ञ, केअर  रेटिंग्ज गेल्या महिन्याभरात रुपयाची डॉलरच्या तुलनेत ७ टक्क्यांहून अधिक घसरणीमुळे आयात वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ संभवते. इंधनाच्या किमतीत त्या प्रमाणात वाढ न केल्यास वित्तीय तूट वाढेल आणि परिणामी महागाई दरही वाढेल. या परिस्थितीत रिझव्‍‌र्ह बँक दरकपातीचा धोका पत्करणार नाही.
* भूपाली गुरसळे, अर्थतज्ज्ञ, एंजल ब्रोकिंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:07 pm

Web Title: rupee gains 47 paise vs us dollar
टॅग Business News,Rupee
Next Stories
1 बरसला!
2 श.. शेअर बाजाराचा : ‘पॅन’विषयी बोलू काही..
3 रिझव्‍‌र्ह बँक-सरकारच्या र्निबधानंतरही सोने-आयात घट अशक्य
Just Now!
X