सोने-चांदी दरात मोठा उतार

डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा ६५च्या तळात शिरला. स्थानिक चलनात मंगळवारी त्यात ४३ पैशांनी आपटी नोंदली गेली. ६४.८८ अशी नरम सुरुवात करणारा रुपया मंगळवारी व्यवहारात ६५.१९ पर्यंत घसरला. सोमवारच्या ६४.७५ या बंद स्तरानंतर आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात चलन कसे बसे ६४.८५ पर्यंत उंचावले होते. मात्र दिवसअखेर त्यात ०.६६ टक्के घसरण झाली.
मुंबई : मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मंगळवारी कमालीचा उतार अनुभवला गेला. किलोमागे ४३५ रुपयांनी खाली येत चांदी थेट ३७,०७० रुपयांवर येऊन ठेपली. तर स्टँडर्ड प्रकारच्या सोन्याचा भाव तोळ्यासाठी १०५ रुपयांनी कमी होऊन २६,४९५ रुपयांपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर सलग सात सत्रांत वाढल्यानंतर मंगळवारी घसरले आहेत.