डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे अवमूल्यन सोमवारी नव्या विक्रमावर पोहोचले.  गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत रुपया ४१ पैशांनी खाली येत ५९.६८ पर्यंत आला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात तो ५९.८३ पर्यंत गेला होता.
महिनाअखेर असल्याने तेल आयातदारांकडून डॉलरची मागणी नोंदली गेल्याने तसेच भांडवली बाजारातून निधी काढून घेण्यासाठी अमेरिकी चलनाची गरज पडल्याने रुपया अधिक अशक्त बनला. रुपयाने गेल्या काही सत्रांमध्येही डॉलरच्या तुलनेत ६० ला गवसणी घातली आहे. व्यवहारात ५९.९८ पर्यंत नीचांकी त्याने गाठली आहे. सत्रअखेर बंद होताना तो ५९. ५७ पर्यंत गेला आहे. गेल्या सप्ताहाच्या शेवटी रुपया ५९.२७ वर होता. सोमवारी मात्र स्थानिक चलन व्यवहारात ५९.८३ पर्यंत खालावले. अखेर आधीच्या व्यवहाराच्या तुलनेत तो ४१ पैशांनी घसरत ५९.२७ वर आला. यापूर्वीचा त्याचा तळ २० जून रोजीचा ५९.५७ असा होता. समभाग आणि रुपयातील कमकुवततेमुळे डॉलर अधिक भक्कम होत आहे, असे अल्पारी फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी म्हटले आहे.