News Flash

रुपयाच्या ६२.५० तळाने धास्ती

गेल्या १० महिन्याच्या तळातील रुपयाने शुक्रवारी ६२.५० पर्यंत पोहोचून कमालीची धडकी भरविली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारपेक्षा ४ पैशांनी वधारत ६२.२९ वर बंद झाला. याचबरोबर

| December 13, 2014 02:05 am

गेल्या १० महिन्याच्या तळातील रुपयाने शुक्रवारी ६२.५० पर्यंत पोहोचून कमालीची धडकी भरविली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारपेक्षा ४ पैशांनी वधारत ६२.२९ वर बंद झाला. याचबरोबर त्याची गेल्या चार व्यवहारातील सततची आपटीही थांबली.
चालू आठवडय़ात सलग चार सत्रात घसरण नोंदविणारे स्थानिक चलन ६२ च्या खाली येताना गेल्या १० महिन्यांच्या नीचांकावर आले होते.
या दरम्यान त्यात ५६ पैशांची आपटीही नोंदली गेली. सप्ताहअखेरच्या सत्रातही चलन थेट ६२.५० पर्यंत घसरताना अधिक कमकुवत बनले. त्याचा व्यवहारातील सुरुवातीचा ६२.४५ तर उच्चांकाचा टप्पा ६२.२६ असा राहिला. परकी चलन व्यवहारानंतर जाहिर होणाऱ्या नोव्हेंबरमधील किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादन दरावर गुंतवणूकदारांची नजर राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2014 2:05 am

Web Title: rupee tumbles to 10 month low vs us dollar
टॅग : Rupee,Us Dollar
Next Stories
1 महागाई दरातील उताराचा दरकपातीचा संकेत
2 सुधाराच्या आशा धुळीला..
3 राज्यांच्या असहमतीने वस्तू व सेवा कर लांबणीवर
Just Now!
X