नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच भारतीय चलनाने अमेरिकी डॉलरसमोर मोठी नांगी टाकली. गुरुवारी परकीय चलन व्यासपीठावर ३२ पैशांनी घसरत ६३.३५ पर्यंत आला.
स्थानिक चलनाची ही गेल्या पंधरवडय़ातील सुमार सत्र आपटी होती. २०१४च्या अखेरच्या दिवशी रुपया ३५ पैशांनी भक्कम बनला होता, तर यापूर्वीच्या दोन्ही सत्रांत तो एकूण ६४ पैशांनी उंचावला होता. गुरुवारची त्याची घसरण ही १६ डिसेंबरच्या ५९ पैसेनंतरची मोठी घसरण ठरली. या वर्षांत ६४ पर्यंत तळ पाहणाऱ्या रुपयाने सलग चौथ्या वर्षांत घसरण नोंदविली.