देशाच्या खेडय़ांमध्ये अर्थव्यवस्थेत गतिमानता आल्याशिवाय, सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) सद्य पातळीवरून लक्षणीय वाढ संभवणार नाही, असे मत गोदरेज अ‍ॅण्ड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांनी व्यक्त केले.

देशाचा ग्रामीण भागाचे उत्पादनांत योगदान वाढत नाही आणि गावे ही आर्थिक क्रियांची केंद्र बनत नाही, तर तोवर दमदार अर्थवृद्धी आपल्यासाठी स्वप्नवतच राहील, असे गोदरेज यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयद्वारे दहाव्या ‘व्हिजनरी लीडर्स मॅन्युफॅक्चरिंग (व्हीएलएफएम)’ संमेलनात बोलताना सांगितले.

आर्थिक उदारीकरणाला भारतात २५ वर्षे लोटली असली तरी प्रतिव्यक्ती जीडीपी वृद्धीचा आलेखांत लक्षणीय तफावत आढळते. शिवाय देशाच्या अर्थवृद्धीची मुख्य चालक शक्ती असलेल्या निर्मिती क्षेत्राच्या या काळातील प्रवासही उत्साहवर्धक नसल्याचे त्यांनी सूचित केले.