नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात एक सामान्य कैदी म्हणून मला येत असलेले अनुभव खूपच धक्कादायक आहे. मला येथे केवळ मूलभूत सोयी दिल्या जात आहेत इथले आयुष्य खूपच वेदनादायक आहे. मात्र तरीही मी खूपच तणावमुक्त जीवन सध्या जगतो आहे..

नातेवाईकांना लिहिलेले हे पत्र अथवा न्यायाधीशांसमोर केलेली ही व्यथा कोणा सामान्य कैद्याची नसूून सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रता रॉय यांचे कथन आहे. गुंतवणूकदारांच्या कोटय़वधींची फसवणूक प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांचा तेथील दिनक्रम हा पुस्तक रुपाने प्रकाशित झाले आहे.

रॉय तुरुंगात असले तरी राजधानीत त्यांच्या ‘लाईफ मंत्रा’ या आत्मकथनसदृश पुस्तक प्रकाशनाचे एकाचवेळी अनेक ठिकाणाहून प्रकाशन करण्यात आले.

लखनऊमध्ये राजकारणी डॉ. अमर रिझी, पद्मश्रीप्राप्त डॉ. मन्सूर हसन, राज्यसभेचे खासदार प्रमोद तिवारी तर मुंबईत कॅप्टन बाना सिंग, गायिका कविता कृष्णमूर्ती, अभिनेता संजय खान, अभिनेत्री किरण जुनेजा आदी उपस्थित होते.