इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने नववर्षांपासून सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि पदोन्नतीच्या अंमलबजावणीची बुधवारी घोषणा केली. करोना संकटकाळाची कृष्णछाया आणि चिंता बाजूला सारत, विशेष प्रोत्साहन म्हणून १०० टक्के परिवर्ती भत्ताही देण्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

इन्फोसिसने बुधवारीच निव्वळ नफ्यात २०.५ टक्के वाढ करीत तो ४,८४५ कोटी रुपयांवर नेणारी सप्टेंबर तिमाहीअखेरची वित्तीय कामगिरी जाहीर केली. उल्लेखनीय या क्षेत्रातील अग्रणी टीसीएसनेही कर्मचाऱ्यांना उदार वेतनवाढ आणि पदोन्नतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सप्टेंबरअखेर इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचे संख्याबळ हे सुमारे २.४० लाख इतके आहे.