05 March 2021

News Flash

बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

ही वाढ १५ टक्के असेल व नोव्हेंबर २०१७ पासून ती मिळेल.

संग्रहित छायाचित्र

देशभरातील विविध ३५ बँकेतील कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढीबाबतचा तिढा बुधवारी संपुष्टात आला.

याबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची बँक कर्मचाऱ्यांची मागणी बँक व्यवस्थापन व कर्मचारी, अधिकारी संघटना यांच्या दरम्यानच्या कराराद्वारे पूर्ण झाली.

यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन व बँक व्यवस्थापकांची संघटना असलेल्या इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या दरम्यान बुधवारी उशिरा करार झाला.

यानुसार २०१७ पासूनची प्रलंबित वेतनवाढ मान्य करण्यात आली. ही वाढ १५ टक्के असेल व नोव्हेंबर २०१७ पासून ती मिळेल. याचा लाभ विविध ३५ बँकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्य़ांना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:12 am

Web Title: salary increase for bank employees abn 97
Next Stories
1 करोना संकटकाळातही ‘ही’ कंपनी करणार १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती
2 राहुल बजाज यांचा बजाज फायनान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
3 लस-आशावादाने ‘सेन्सेक्स’ची ५११ अंश झेप
Just Now!
X