मोबाइलधारकांची मोठी पसंती मिळविणाऱ्या सॅमसंगच्या गॅलेक्झी सिरिजमध्ये एस४ हा नवा हॅन्डसेट दाखल झाला आहे. एचडीसह पाच इंच स्क्रीन असणारा अ‍ॅन्ड्रॉइड तंत्रज्ञानावर आधारित हा फोन थ्रीजी तसेच टूजीवर चालू शकेल. त्याचा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. कंपनीने अद्याप या मोबाइलची किंमत जाहीर केलेली नाही. स्पर्धक आयफोन५ ला टक्कर देण्यासाठी हा फोन कंपनीने बाजारात आणला आहे. जागतिक मोबाइल बाजारपेठेत सॅमसंगचा हिस्सा तब्बल ३०.३ तर आयफोनच्या अ‍ॅप्पलचा १९.१ टक्के आहे.