News Flash

सॅमसंगतर्फे स्मार्ट टीव्हीची नवीन मालिका

‘सॅमसंग’ कंपनीतर्फे बुधवारी स्मार्ट आणि एलईडी टीव्हीच्या नवीन मालिका सादर करण्यात आल्या. सॅमसंग इंडियाच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. के. किम या वेळी उपस्थित

| April 12, 2013 12:19 pm

‘सॅमसंग’ कंपनीतर्फे बुधवारी स्मार्ट आणि एलईडी टीव्हीच्या नवीन मालिका सादर करण्यात आल्या. सॅमसंग इंडियाच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. के. किम या वेळी उपस्थित होते.
स्मार्ट टीव्ही मालिकेत हाताच्या हालचाली आणि आवाजाचा वापर करून टीव्हीचे नियंत्रण करण्याची सोय आहे, तर रिमोट कंट्रोलऐवजी एका टचपॅडवर हव्या त्या टीव्ही वाहिनीचा क्रमांक लिहून वाहिनी बदलता येणार आहे. या मालिकेत ‘सॅमसंग स्मार्ट हब’ या वैशिष्टय़ाचाही समावेश आहे. यात टीव्हीवर वापरता येण्याजोगे सुमारे एक हजार अ‍ॅप्स उपलब्ध होऊ शकतील. यातील ७५० अ‍ॅप्स जागतिक पातळीवर वापरता येतील, अशी तर २५० अ‍ॅप्स देशात वापरण्यासाठी विकसित करण्यात आली आहेत. टीव्हीवर गाणी किंवा चित्रपट डाऊनलोड करून पाहण्यासाठी यातील अ‍ॅप्सचा उपयोग होणार आहे. एलईडी टीव्हीतील ‘जॉय’ मालिकेत ‘कनेक्टमशेअर’ या वैशिष्टय़ाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 12:19 pm

Web Title: samsung launches new smart tv series models
टॅग : Business News,Tv
Next Stories
1 १२ वर्षांत प्रथमच कार विक्रीचा टक्का घसरला
2 ‘किंगफिशर’ची उड्डाणे पुन्हा सुरू होणार?
3 ‘सेबीला माझ्या वैयक्तिक मालमत्तेतच अधिक रस’
Just Now!
X