News Flash

भारतीय ग्राहकांसाठी दोन नव्या मोबाईल फोनचे जागतिक अनावरण

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने दोन नवे स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत.

सॅमसंग इंडियाचे मोबाइल व्यवसाय विभागाचे प्रमुख मनू शर्मा

सॅमसंगची तरुणाईला ‘टेक’ साद
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने दोन नवे स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत. गुरुवारी मलेशियात झालेल्या सॅमसंग तंत्रज्ञान फोरममध्ये याची घोषणा करण्यात आली. लोकप्रिय गॅलेक्सी मालिकेतील ए ७ आणि ए ५ या नवीन फोन यानिमित्ताने जागतिक अनावरण झाले, पण ती केवळ भारतीय व खासकरून तरुण ग्राहकांना लक्ष्य करून विकसित केली गेली आहेत.
दोन्ही फोनचे ग्लास व मेटल बॉडी हे वैशिष्टय़ आहे, असे सॅमसंग इंडियाचे मोबाइल व्यवसाय विभागाचे प्रमुख मनू शर्मा यांनी सांगितले. गॅलेक्सी ए ७ आणि ए ५ या दोन्ही मोबाइलमध्ये १३ मेगा पिक्सल कॅमेरा तर ५ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा, वेगवान बॅटरी चाìजग फीचर्स, ओक्टा कोअर प्रोसेसर आहेत. गॅलेक्सी ए ७ मोबाइलची किंमत ३३,४०० रुपये, तर गॅलेक्सी ए ५ ची किंमत २८,४०० रुपये आहे.
या वैशिष्टय़ांमुळे हे दोन्ही मोबाइल लवकरच भारतीयांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. याबरोबरच टायझेन ऑपरेटिंग सिस्टीमचा कव्र्हड स्मार्ट टीव्हीही गुरुवारी येथे सादर केला गेला. या टीव्ही संचात प्रक्षेपित होणारे आपले आवडते कार्यक्रम जतन करून ठेवता येण्याबरोबरच, सेवा, गेम्स व अॅप्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. तसेच स्मार्ट रेफ्रिजरेटर, इन बिल्ट स्टेबिलायझर असलेला एसी, अॅड वॉश सुविधेसह वॉिशग मशीन, स्मार्ट ओव्हन, अल्ट्रा हाय डेफिनिशन मॉनिटर्स अशी उत्पादने सॅमसंगने बाजारात आणली आहेत. भारतीय ग्राहकांची गरज लक्षात घेऊन या उत्पादनांमध्ये नव्या सुविधा अंतर्भूत केल्या आहेत, असे सॅमसंग इंडियाच्या कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्सचे राजीव भुतानी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 5:40 am

Web Title: samsung launches two new phone
Next Stories
1 ‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार
2 फुलरटन इंडिया गृहवित्त क्षेत्रात
3 ‘मेट्रो कॅश अँड कॅरी’वर राजीव मेडिरत्ता
Just Now!
X