News Flash

घोडावत समूह खाद्य उद्योगात

१३५ अब्ज डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारतीय खाद्य बाजारपेठेत प्रवेश करत कोल्हापूरस्थित संजय घोडावत समूहाच्या ‘स्टार ५५५’ या खाद्य नाममुद्रेचे उद्घाटन केले.

| October 14, 2014 12:57 pm

१३५ अब्ज डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारतीय खाद्य बाजारपेठेत प्रवेश करत कोल्हापूरस्थित संजय घोडावत समूहाच्या ‘स्टार ५५५’ या खाद्य नाममुद्रेचे उद्घाटन केले.
‘स्टार ५५५’ नाममुद्रेंतर्गत समूहाने प्रथम ‘नमकीन’ बाजारपेठेला लक्ष्य केले असून यामध्ये आलू भुजिया, क्रंची मटर, िशग भुजिया, मूंग डाल, स्पायसी मिक्स, प्रीमियम सॉल्टेड पोटॅटो चिप्स, सॉसी टोमॅटो पोटॅटो चिप्स, मस्ती मसाला पोटॅटो चिप्स, मसाला फटाके आणि टोमॅटो फटाके यांसारखे स्नॅक्स सादर केले आहेत.
खाद्य बाजारपेठेतील आघाडीच्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी पुढील दोन वर्षांत आपल्या उत्पादनांमध्ये भर घालण्यासाठी संजय घोडावत समूहाने मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली असून या बाजारपेठेत आघाडी मिळविण्यासाठी समूह प्रयत्नशील असे, असे समूहाने म्हटले आहे. या खाद्य पदार्थासाठी समूहाने कोल्हापूरनजीकच्या चिपरी येथे प्रकल्प साकारला आहे. याबाबत संजय घोडावत समूहाचे संचालक श्रेणीक घोडावत म्हणाले की, आम्ही सातत्याने उत्पादनांचा आक्रमकपणे विस्तार करत असून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात ही विकासाची यशोगाथा अशीच चालू ठेवू. ‘स्टार ५५५’ नमकीन उत्पादने उत्कृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरून बनवली जातात व ती मिल उत्पादनांपासून तयार केली जात नाहीत. समूहाच्या वतीने ‘स्टार ५५५’साठी ‘अबकी बार चटपटा स्टार’ ही अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली विपणन मोहीम सुरू करण्यात येणार असून याकरता माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना करारबद्ध करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 12:57 pm

Web Title: sanjay ghodawat group enter into food business
Next Stories
1 वाहन खरेदीदारांचा दसरा, दिवाळीसाठी ‘यलो सिग्नल’
2 किरकोळ महागाई दर किमान स्तरावर
3 सूर्या गृहोपयोगी उपकरण बाजारपेठेत; २०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य
Just Now!
X