05 June 2020

News Flash

शतकी घसरणीने ‘सेन्सेक्स’चा साप्ताहिक नीचांक

नफेखोरीसाठी झालेल्या विक्रीतून बांधकाम, वाहन क्षेत्रातील समभाग तर चिंतेमुळे टाटा मोटर्स, एचडीआयएलसारख्या समभागांच्या आपटीने ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी शतकी घसरण नोंदवत २० हजाराच्या खालचा स्तर गाठला.

| January 25, 2013 12:01 pm

नफेखोरीसाठी झालेल्या विक्रीतून बांधकाम, वाहन क्षेत्रातील समभाग तर चिंतेमुळे टाटा मोटर्स, एचडीआयएलसारख्या समभागांच्या आपटीने ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी शतकी घसरण नोंदवत २० हजाराच्या खालचा स्तर गाठला. १०३.८४ अंश घसरणीमुळे तो १९,९२३.७८ वर स्थिरावताना आठवडय़ाच्या नीचांकावर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३४.९५ अंश घसरणीसह पुन्हा ६ हजारापर्यंत, ६,०१९.३५ पोहोचला. सकाळच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ २० हजारावरच प्रवास करत होता. मात्र ब्रिटिश ब्रॅण्ड जग्वार अ‍ॅण्ड लॅण्ड रोव्हरच्या संभाव्य नफ्यातील घसरणीच्या चिंतेने टाटा मोटर्सचे समभाग मूल्य ६% घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2013 12:01 pm

Web Title: sansex down
Next Stories
1 बँका सलग तीन दिवस बंद
2 एअरटेल’ने कोंडी फोडली!
3 मुदत मोठी, कर्जफेडीचा हप्ता छोटा
Just Now!
X