करोना महासाथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेक कर्मचारी आपल्या घरूनच काम करत होते. तर दुसरीकडे अद्यापही अनेक कर्मचारी घरून काम करत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा जास्तीतजास्त वेळ हा इंटरनेटवर जात आहे. परंतु याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. यासाठी HDFC बँकेनं एक कॅम्पेन सुरू केलं आहे. या कॅम्पेनचं नाव ‘मूंह बंद रखो’ असं ठेवण्यात आलं आहे.

देशभरात पुढील चार महिन्यांसाठी बँक एक हजार वर्कशॉप चालवणार आहे. बॅकेच्या नुसार फोन, एसएमएस, ईमेल आणि सोशल मीडियावर कार्ड डिटेल्स, CVV, एक्सपायरी डेट, ओटीपी, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, लॉग इन आयडी आणि पासवर्ड शेअर न करता पैसे सुरक्षित ठेवू शकता, असं बँकेनं सांगितलं आहे. या कॅम्पेनमध्ये बँक लोकांना माहिती देणार आहे.

या गोष्टींचं पालन आवश्यक
HDFC बँक किंवा इतर कोणतीही बँक आपणास ईएमआय पेमेंट पुढे ढकलण्यासाठी ओटीपी, नेटबँकिंग / मोबाइल बँकिंग पासवर्ड, युझर आयडी, यूपीआय पिन शेअर करण्यास सांगत नाही. आपली कोणतीही वैयक्तिक माहिती फोन, एसएमएस, ईमेल वर कोणालाही शेअर करू नका.

आपला पिन, पासवर्ड, बँक तपशील कोणालाही शेअर करू नका.

आपला घराचा पत्ता, संपर्क क्रमांक किंवा ईमेल आयडी बदलल्यास आपल्या बँकेला त्याची माहिती द्या.

जेव्हा आपला मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप कोणत्याही सार्वजनिक किंवा नि: शुल्क वायफायशी कनेक्ट केलेला असेल तेव्हा बँकिंग व्यवहार करू नका जे असुरक्षित आहे.

जर तुमच्या खात्यात किंवा कार्डात संशयास्पद व्यवहार आढळल्यास एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी तुम्हाला कॉल करेल. बँक आपल्याशी ६१६०७४७५ या फोन नंबरवरुन संपर्क साधेल.

आपल्या स्थानिक बँकेचा क्रमांक कायम आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह ठेवा. १८००२५८६१६१ या क्रमांकावर HDFC बँकेशी संपर्क साधू शकता.