News Flash

स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात; गृहकर्ज होणार स्वस्त

१० सप्टेंबर मंगळवारपासून नवे व्याजदर लागू होणार

देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेल्या ‘एसबीआय’ने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने सर्व कालावधीतील कर्जावरील व्याजदरात (marginal cost of lending rate) कपात करत असल्याची घोषणा सोमवारी केली. एमसीएलआरमध्ये १० बेसिक पॉइंटची कपात आहे. यामुळे गृहकर्जही स्वस्त होणार आहे, तर मुदत ठेवीवरील व्याजदर घटवले आहेत. कपात केली आहे. १० सप्टेंबर अर्थात मंगळवारपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत.

एसबीआयने २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने आढावा बैठकीनंतर रेपो दर १.१ टक्क्यांनी कमी केल्यानंतर एसबीआयने कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बँकेच्या तिजोरीत असलेली रोख रक्कम हेही एक कारण मुदत ठेवीवरील व्याजदर कपातीमागे असल्याचे म्हटले जात आहे. बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत.

बँकेने किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांवरून ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. तर मोठ्या मुदत ठेवीवरील व्याजदर ०.१० टक्क्यांवरून ०.२० टक्के इतका कमी करण्यात आला आहे. कर्जावरील व्याजदरात (marginal cost of lending rate) ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे बँकेचा वार्षिक मुदतीचा एमसीएलआर (marginal cost of lending rate) ८.२५ वरून घटून ८.१५ टक्क्यांवर आला आहे. उद्यापासून (१० सप्टेंबरपासून) नवीन व्याजदर लागू होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 12:28 pm

Web Title: sbi cuts interest rates bmh 90
Next Stories
1 वाहन क्षेत्राने जीएसटी कपातीचा रेटा राज्यांच्या अर्थमंत्र्यांपुढेही लावावा- ठाकूर
2 सलग दुसऱ्या दिवशी वाहन समभाग तेजाळले
3 बाजार-साप्ताहिकी : मुसळधार!
Just Now!
X