News Flash

‘एसबीआय डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेज फंड’ विक्रीला खुला!

आघाडीच्या एसबीआय म्युच्युअल फंडाने आपल्या मुदत बंद (क्लोज एंडेड) प्रकाराच्या ‘एसबीआय डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेंज फंडा’ची मालिका दुसरी विक्रीला खुली केली आहे

| May 2, 2014 01:04 am

आघाडीच्या एसबीआय म्युच्युअल फंडाने आपल्या मुदत बंद (क्लोज एंडेड) प्रकाराच्या ‘एसबीआय डय़ुएल अ‍ॅडव्हान्टेंज फंडा’ची मालिका दुसरी विक्रीला खुली केली आहे. कर्जरोख्यांवर गुंतवणूक केंद्रीत असलेला हा हायब्रीड धाटणीचा ३६ महिने मुदतीचा फंड आहे.
मध्यम स्वरूपाची जोखीम घेऊन कर कार्यक्षम गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल. या फंडातून ५०टक्के ते ९५ टक्के इतकी गुंतवणूक डेट पर्यायांमध्ये म्हणजे उपलब्ध उच्च गुणवत्तेच्या रोख्यांमध्ये केली जाईल, तर शून्य ते २५ टक्के मनी मार्केट पर्यायात तर शक्य झाल्यास ५ टक्के ते २५ टक्के मालमत्ता समभाग आणि समभागसदृश पर्यायात गुंतविली जाईल. या फंडाची विक्री २२ एप्रिलपासून सुरू झाली असून ती ५ मे २०१४ पर्यंत सुरू राहील. किमान ५,००० रुपयांपासून पुढे या फंडात गुंतवणूक करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2014 1:04 am

Web Title: sbi dual advantage fund open to sale
Next Stories
1 महाराष्ट्रातून दरमहा तब्बल ४०० कोटींची परप्रांतात ‘मनीऑर्डर’
2 ‘निफ्टी बीस’ काय आहे, घ्यायचे कसे?
3 मोबाइल कॉल दरात वाढ अटळ ‘एअरटेल’कडून स्पष्ट संकेत
Just Now!
X