News Flash

सीतारामन संतापल्या : SBI अध्यक्षांना म्हणाल्या… “तुम्ही निर्दयी, अकार्यक्षम आहात”

भाषणाची ऑडिओ क्लीप झाली व्हायरल

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या State Bank of India अर्थात एसबीआयच्या वरिष्ठांवर अर्थमंत्री सीतारामन प्रचंड संतापल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तुम्ही निर्दयी आहात. तुम्ही अकार्यक्षम आहात. दिल्लीत भेटा असा संताप त्यांनी एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांच्यावर व्यक्त केला.

घडलं असं की, गुवाहटी येथे २७ फेब्रुवारी रोजी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी आणि वित्तीय सेवा विभागाच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या. या कार्यक्रमाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यात त्या रजनीश कुमार यांना प्रचंड संतापाच्या स्वरात बोलताना ऐकायला मिळतं.

चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचे २.५ लाख खाते एसबीआयमध्ये अकार्यरत होते. ही गोष्ट निर्मला सीतारामन यांना कळाली आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ऑडिओ क्लीपमध्ये त्या एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांना असं विचारताना स्पष्ट ऐकायला येतं की, “तुम्ही किती वेळात ती सारी खाती पुन्हा कार्यरत करणार आहात?” त्यावर रजनीश कुमार सांगतात की, “यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी एक आठवडा जाईल.”

या उत्तरानंतर सीतारामन भडकल्याचे क्लीपमध्ये ऐकायला मिळतं. त्या संतापाच्या स्वरात म्हणताता… “माझी दिशाभूल करू नका… अजिबात दिशाभूल करू नका. या प्रकरणी आता तुम्ही मला दिल्लीत भेटा. मी हा विषय सोडणार नाही. ही पूर्णपणे कामचोरी आहे. याबद्दल मी तुम्हाला जबाबदार धरतेय. या विषयावर आता मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करेन. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांची खाती सुरू करा. तुमच्या हेकेखोरपणाचा त्या गरिबांना फटका बसायला नको.”

सीतारामन यांच्या या वक्तव्याचा ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (एआयबीओसी) असोसिएशनने निषेध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 11:30 am

Web Title: sbi heartless inefficient finance minister nirmala sitharaman tells chairman assam tea workers pkd 81
टॅग : Nirmala Sitharaman
Next Stories
1 येस बँक बुधवारपासून निर्बंधमुक्त
2 खुशखबर : पुढील तीन दिवसात येस बँकेवरील निर्बंध हटणार
3 उत्पादन शुल्क कर वाढवल्यामुळे पेट्रोल, डिझेल महागणार
Just Now!
X