पाच सहयोगी बँकांचाही ताबा घेण्याचा बँकेचा प्रस्ताव

गेल्या अनेक वर्षांपासून पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाच्या चर्चेत असलेल्या देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँक स्टेट बँकेने भारतीय महिला बँकेलाही ताब्यात घेण्याबाबत उत्सुकता दर्शवत तमाम बँक वर्तुळाला धक्का दिला आहे.
स्टेट बँकेने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असून अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, असे बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पाच सहयोगी बँकांचे मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरणाचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे वेळोवेळी बारगळला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच केवळ महिलांसाठी अस्तित्वात आलेल्या भारतीय महिला बँकेचा प्रस्ताव सादर करत स्टेट बँकेने अनपेक्षित पाऊल उचलले आहे.
अन्य पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण निश्चित असले तरी भारतीय महिला बँकेचे पूर्णत: विलीनीकरण अथवा बँकेचा सर्व व्यवसाय आपल्या अखत्यारीत ठेवण्याबाबत केवळ निर्णय बाकी आहे.
स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांना आपल्या विलीन करून घेण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारच्या प्राथमिक मंजुरीसाठी बँक प्रयत्नशील आहे, तर हे विलीनीकरण विनासाय व्हावे याासाठी संबंधित पाच सहयोगी बँकांबरोबर चर्चाही करण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबतचा अंतिम निर्णय स्टेट बँकेच्या संचालक मंडळात घेतला जाणार आहे.
प्रमुख स्टेट बँकेच्या स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाळा व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका आहेत.
स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र (२००८) व स्टेट बँक ऑफ इंदूर (२०१०) या सहयोगी बँकांचे यापूर्वीच मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे. यानंतर स्टेट बँकेने स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर या बँकेला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे तो मागे पडला.
सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणासाठी केंद्र सरकारने बँक बोर्ड ब्युरो अस्तित्वात आणले आहे. हे मंडळ सार्वजनिक बँकांमधील प्रमुख तसेच व्यवस्थापकीय संचालक पदावरील नियुक्त्यांमध्येही लक्ष घालणार आहे.

SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…

विलीनीकरण
विरोधात शुक्रवारी संप
पाच सहयोगी बँकांना मुख्य बँकेत विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मुख्य स्टेट बँक मंगळवार सादर करत नाही तोच बँकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी या विलीनीकरणाला तीव्र नव्याने लगेच जाहीर केला. पाच सहयोगी बँकांमधील कर्मचारी येत्या शुक्रवारी (२० मे) एक दिवसाच्या संपावर जात असल्याची घोषणा ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) ने केली. सहयोगी बँकांना आपल्यात सामील करून घेण्याचा स्टेट बँकेचा निर्णय जबरदस्तीचा असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय महिला बँक या पहिल्या सार्वजनिक महिला बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्तावही स्टेट बँकेने सादर केला आहे.

स्टेट बँक समभाग उसळले
पाच सहयोगी बँकांना मुख्य बँकेत सहभागी करून घेण्याचा विचार स्टेट बँकेच्या समभाग मूल्याच्या पथ्यावर पडला. व्यवहारात स्टेट बँकेचा समभाग १३ टक्क्य़ांनी उसळला. त्याचबरोबर बाजारात सूचिबद्ध सहयोगी बँकांचेही समभागही उंचावले. दिवसअखेर मात्र प्रमुख स्टेट बँक समभाग किरकोळ घसरला.
सहयोगी पाचपैकी तीन स्टेट बँका या सध्या बाजारात सूचिबद्ध आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारातील ५ टक्के हिस्सा विक्रीच्या निर्णयाचाही विपरीत परिणाम मुख्य स्टेट बँकेच्या समभागावर मंगळवारी जाणवला. यानंतर १० टक्के हिस्सा ठेवणाऱ्या बँकेला या माध्यमातून १,००० कोटी रुपये उभारता येतील.

स्टेट बँक रु. १७७.०५ -०.०८%
स्टेट बँक ऑफ म्हैसूर रु. ४२६.७० +१२.७६%
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर रु. ३९९.१० +९.८७%
स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर रु. ५०८.९५ +४.२२%