08 March 2021

News Flash

सेबी अध्यक्ष त्यागी यांना मुदतवाढ

सेबी अध्यक्ष होण्यापूर्वी ते अर्थ व्यवहार विभागाच्या गुंतवणूक या विषयाचे सचिवपदी कार्यरत होते.

| February 29, 2020 07:49 am

नवी दिल्ली : भांडवली बाजाराची नियामक यंत्रणा असलेल्या सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांना सरकारने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. इच्छुक उमेदवारांतून नवीन अध्यक्षाच्या निवडीची १० फेब्रुवारीची मुदत उलटल्यानंतरही याबाबतची प्रक्रिया पार न पडल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे मानले जाते.

या पदासाठी अर्थ व्यवहार सचिव अतनू चक्रबर्ती, कंपनी व्यवहार सचिव ई. श्रीनिवास, अर्थ मंत्रालयातील अतिरिक्त सचिव प्रविण गर्ग तसेच सेबीच्या सध्याच्या पूर्णवेळ सदस्या माधवी पुरी बुच यांच्यासह २४ जणांनी अर्ज केला असल्याचे कळते.

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे हिमाचल केडरमधील त्यागी यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून १ मार्च २०१७ रोजी नियुक्ती झाली. पहिल्या तीन वर्षांसाठी त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षे त्यांना मुदतवाढ मिळाली. सेबी अध्यक्ष होण्यापूर्वी ते अर्थ व्यवहार विभागाच्या गुंतवणूक या विषयाचे सचिवपदी कार्यरत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:43 am

Web Title: sebi chief ajay tyagi gets 6 month extension zws 70
Next Stories
1 शेअर बाजाराला ‘कोरोना’ची लागण; साडेपाच लाख कोटी बुडाले
2 पडझड सत्र सुरूच
3 वाढीव कर्जवितरणाइतकीच बँकांना ‘सीआरआर’ वजावट – रिझव्‍‌र्ह बँक
Just Now!
X