07 March 2021

News Flash

दिल्लीत ‘सेबी’चे विशेष न्यायालय

भांडवली बाजार नियंत्रक - ‘सेबी’शी संबंधित तंटे-कज्जांची गतिमान सुनावणी होऊन

भांडवली बाजार नियंत्रक – ‘सेबी’शी संबंधित तंटे-कज्जांची गतिमान सुनावणी होऊन लवकर तड लागावी यासाठी राजधानी दिल्लीत विशेष सेबी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. देशभरात स्थापण्यात आलेले हे चौथे विशेष सेबी न्यायालय आहे. २०१४ मध्ये सेबी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे तीन विशेष न्यायालये कार्यान्वित झाली असून, या मालिकेतील चौथे न्यायालय दिल्लीत स्थपण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. सरकार आणि उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून या विशेष न्यायालयांची रचना करण्यात आली आहे. ही विशेष न्यायालयांवर केंद्र सरकारकडून एका न्यायाधीशाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीशी विचारविनिमय करून केली जाईल. सेबी कायद्यातील दुरुस्तीने नव्याने प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे सेबीला नियमभंग करणाऱ्या कंपन्यांकडून दंडवसुली, दंडवसुली करताना बँक खाते व स्थावर-जंगम मालमत्तांवर जप्ती आणि प्रसंगी आरोपीला अटक करण्याचेही अधिकारही ‘सेबी’ने मिळविले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 7:42 am

Web Title: sebi special court to come up in delhi
टॅग : Arthsatta,Loksatta,Sebi
Next Stories
1 ‘क्लियरटॅक्स’कडून निधी उभारणी
2 ‘पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंडा’कडून तीन वर्षांत १९.६६ टक्केदराने परतावा
3 ‘रिचफील’चे १०० चिकित्सा केंद्रांचे लक्ष्य
Just Now!
X