24 September 2020

News Flash

घसरण अखेर थांबली; सेन्सेक्समध्ये द्विशतकी भर

गेल्या सलग पाच सत्रांपासून घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने बुधवारी त्यात खंड पाडला. वस्तू व सेवा कराबाबतचे विधेयक लवकरच संसदीय अधिवेशनात मांडण्याच्या अर्थमंत्र्यांच्या संकेताने प्रमुख निर्देशांकांना

| April 23, 2015 01:35 am

गेल्या सलग पाच सत्रांपासून घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने बुधवारी त्यात खंड पाडला. वस्तू व सेवा कराबाबतचे विधेयक लवकरच संसदीय अधिवेशनात मांडण्याच्या अर्थमंत्र्यांच्या संकेताने प्रमुख निर्देशांकांना उभारी मिळाली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१४.१९ अंश वाढीसह २७,८९०.१३ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५१.९५ अंश वाढीसह ८,४२९.७० वर पोहोचला.
कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबत नाराजी व्यक्त करत गुंतवणूकदारांनी गेल्या सलग पाच व्यवहारांत मुंबई निर्देशांकाला घसरण नोंदविण्यास भाग पाडले. या दरम्यान सेन्सेक्स १,३७० अंशांनी खाली आला आहे.
सत्रादरम्यान १५१ अंशांच्या उतरणीचा प्रवास करणारा सेन्सेक्स व्यवहारात २७,५०० च्याही खाली उतरत, २७,३८५.४८ पर्यंत आला होता. शेवटच्या तासाभरात पुन्हा खरेदीचा जोर वाढून मुंबई निर्देशांक सत्रात २७,९४७.२६ पर्यंत झेप घेतल्यानंतर दिवसअखेर तेजीसह बंद झाला. याचबरोबर निफ्टीने ८,४०० पुढील टप्पा बुधवारच्या व्यवहाराखेर गाठला. भांडवली वस्तू, औषध निर्माण, बँक समभागांमध्ये बुधवारी खरेदी नोंदली गेली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू १.८८ टक्के वाढीसह आघाडीवर होता. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, एलअ‍ॅण्डटी, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज्, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टाटा पॉवर, एचडीएफसी यांचे समभाग मूल्य वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 1:35 am

Web Title: sensex
टॅग Sensex
Next Stories
1 आता ४ डी तंत्रज्ञानावर चित्रपटाचा आस्वाद
2 वाहन शोधकर्त्यांचा गुगलवर ‘यू’ टर्न!
3 महिंद्रचा प्रकल्प विस्तार दक्षिणेत; महाराष्ट्रातील विस्ताराबाबत मात्र अनिश्चितता
Just Now!
X