27 September 2020

News Flash

‘सेन्सेक्स’कडून ३० हजाराचे अभूतपूर्व शिखर आणि माघारही!

सकाळीच व्याजदर कपातीच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकस्मिक घोषणेने भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांकांच्या विक्रमी उसळीच्या उधळलेल्या ‘रंगा’ने एक दिवसच आधीच धुळवड सेन्सेक्सने व्यवहाराच्या

| March 5, 2015 06:28 am

सकाळीच व्याजदर कपातीच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकस्मिक घोषणेने भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांकांच्या विक्रमी उसळीच्या उधळलेल्या ‘रंगा’ने एक दिवसच आधीच धुळवड सेन्सेक्सने व्यवहाराच्या सुरुवातीलाच अभूतपूर्व ३० हजाराचा तर निफ्टीने ९,१०० चे शिखर सर केले. दिवसभरातील खरेदीचा उत्साही जोश व्यवहाराच्या अखेरच्या दीड तासात मात्र शमला आणि गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने दिवसअखेर निर्देशांकांना ‘घसरण रंग’ फासला गेला.
कर्ज स्वस्ताई येण्याच्या हर्षांने ३०,०२४.७४ वर गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर आपल्या या उच्चांकापासून ४९९ अंश खाली ओसरला. दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत २१३ अंशांनी घसरत तो पुन्हा ३० हजाराखाली, २९,३८०.७३ वर येऊन स्थिरावला. तर ९,१२० पर्यंतची वाटचाल नोंदविणारा निफ्टी सत्रअखेर ७३.६० अंश आपटीसह ८,९२२.६५ वर बंद झाला.
अर्थसंकल्पानंतर गेल्या सलग चार दिवसात सेन्सेक्सने ८५० अंशांची तेजी दाखविली आहे. बुधवारच्या व्यवहारात मात्र सेन्सेक्स त्याच्या सर्वोच्च टप्प्यापासून बंद होताना ६५० अंशांनी घसरला. सुरुवातीची सर्व खरेदी नफ्यामध्ये बदलण्यासाठी गुंतवणूकदारांनी शेवटच्या व्यवहारात समभाग विक्रीचा सपाटा लावला. व्याजदर कपातीने उंचावलेल्या बँक, स्थावर मालमत्ता, वाहन समभागांमध्ये प्रामुख्याने नफेखोरी अनुभवली गेली. बँक, गृहनिर्माण कंपन्यांचे समभाग तीन टक्क्य़ांपर्यंत रोडावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 6:28 am

Web Title: sensex crossed 30000 benchmark level
Next Stories
1 उद्योगक्षेत्राकडून कौतुकाची थाप!
2 कंपन्यांच्या भागविक्रीतून निधी उभारणी, म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांचा सुकाळ
3 २०१४ मध्ये प्रस्तुत झालेली स्मार्टफोन मांदियाळी
Just Now!
X