06 July 2020

News Flash

सेन्सेक्स ३२ हजारांपार

दोन दिवसांत १,६०० अंशांची कमाई

संग्रहित छायाचित्र

जगभरात अर्थचक्र पुन्हा रुळावर येण्याबद्दल आशावाद आणि युरोपीय महासंघाकडून जाहीर झालेले करोना संकटावरील आर्थिक मदतीच्या महापॅकेजसंबंधी सकारात्मकतेने भांडवली बाजारात सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांनी दमदार उसळी घेतली. गुरुवारी ६०० अंशांच्या उसळीने सेन्सेक्सने ३२ हजारांपल्याड गाठला. दोन दिवसांत सेन्सेक्सने जवळपास १,६०० अंशांची कमाई केली आहे.

बुधवारच्या व्यवहारातील तेजीचा क्रम पुढे सुरू ठेवत, बाजारात गुरुवारच्या व्यवहारातही एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, रिलायन्स, एल अँड टी आणि आयसीआयसीआय बँक या वजनदार समभागांची दणक्यात खरेदी झाली. परिणामी सेन्सेक्सने ५९५.३७ अंशांची नव्याने भर घालत, गुरुवारी व्यवहार आटोपताना ३२,२६७.२३ या पातळीवर विश्राम घेतला. निफ्टीने १७५.१५ अंश कमावून (१.८८ टक्के) ९,४९०.१० असा ९,५०० नजीकचा स्तर गाठला.

जागतिक स्तरावरील भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या परिणामाने स्थानिक बाजारात सर्वव्यापी खरेदीचा उत्साह गुरुवारी दिसून आला. चलन बाजारात मात्र रुपयाचे मूल्य पाच पैसे घसरून ते प्रति डॉलर ७५.७६ पातळीवर दिवसअखेर स्थिरावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 3:05 am

Web Title: sensex crosses 32000 earnings of 1600 points in two days abn 97
Next Stories
1 सरकारी कंपन्यांकडून अधिकाधिक धन‘लाभांशा’चा सरकारचा मानस
2 ‘ई-पॅन’चे वितरण
3 स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात दुसरी मोठी कपात
Just Now!
X