28 September 2020

News Flash

सेन्सेक्समध्ये घट, तर निफ्टीत किरकोळ वाढ

सप्ताहअखेरच्या सत्रात नफेखोरी साधत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात संमिश्र चित्र निर्माण केले. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये २१.७९ अंश घसरण होत मुंबई निर्देशांक २७,०९०.४२ पर्यंत खाली आला, तर राष्ट्रीय

| September 20, 2014 04:05 am

सप्ताहअखेरच्या सत्रात नफेखोरी साधत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात संमिश्र चित्र निर्माण केले. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये २१.७९ अंश घसरण होत मुंबई निर्देशांक २७,०९०.४२ पर्यंत खाली आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराने ६.७० अंश वाढीसह ८,१२१.४५ चा स्तर राखला.
मुंबई शेअर बाजारातील भांडवली वस्तू, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री झाली. टाटा समूहातील कंपन्यांचे मूल्यांकन वधारल्याने टीसीएसचा समभाग सेन्सेक्समध्ये तेजीत आघाडीवर राहिला. सेन्सेक्सला मोठय़ा घसरणीपासून रोखण्यात माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती क्षेत्रातील समभागांचा हातभार लागला, तर एल अ‍ॅन्ड टी, ओएनजीसी, रिलायन्स, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग मूल्य रोडावले. स्मॉल व मिड कॅपमध्ये अनुक्रमे ०.६३ व ०.०४ टक्के वाढ झाली.
तेजीचा सलग सहावा आठवडा!
आधी सलग दोन व्यवहारातील ६१९.७० अंश वाढीमुळे सेन्सेक्सला साप्ताहिक तुलनेत २९.३७ अंश वाढ राखता आली आहे. त्यामुळे निर्देशांकांनी सलग सहावा आठवडा तेजीने नोंदविले आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात मोठा प्रवास राहिला आहे.
रुपया आठवडय़ाच्या उच्चांकावर
मुंबई: सप्ताहाची अखेर करताना भारतीय चलनाने शुक्रवारी सलग चौथ्या व्यवहारात वाढ नोंदविली. अवघ्या ३ पैशांनी वधारूनही रुपया ६०.८१ या आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला. त्याचबरोबर गेल्या सात सप्ताहातील पहिली साप्ताहिक घटही नोंदविली. सप्ताहात चार दिवस वाढ राखणाऱ्या चलनाने या आठवडय़ात सोमवारी तब्बल ४८ पैशांची आपटी नोंदविली होती. परिणामी चलन सप्ताह तुलनेत १६ पैशांनी रोडावले. शुक्रवारी चलनाचा प्रवास ६०.८९ ते ६०.७३ असा वधारता राहिला. रुपया आता १२ सप्टेंबरच्या ६०.६५ या टप्प्यानजीक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 4:05 am

Web Title: sensex down nifty rise
टॅग Nifty,Sensex
Next Stories
1 ‘अलिबाबा’ अन् ४० महाकंपन्या!
2 भारत पेट्रोलियमकडून ३५ हजार कोटींची गुंतवणूक
3 कर्जबुडव्यांवर फास अधिक घट्ट;‘यूको बँक’चीही नोटीस सज्जता!
Just Now!
X