रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीबाबत सकारात्मकेतून, भांडवली बाजारात सोमवारी बँका आणि व्याजदराबाबत संवेदनशील वाहन उद्योगातील समभागांना दमदार मागणी आणि मूल्यबळ मिळताना दिसून आले. परिणामी बाजाराचा मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ला सलग चौथ्या सत्रात वाढीचा क्रम सुरू ठेवून, मंगळवारच्या ७२.५० अंशांच्या कमाईसह २८,१८७.०६ अंशांची पातळी गाठता आली. निफ्टी निर्देशांकाला मात्र भावनिक व तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची ८५५० अंशांची पातळी ओलांडता आली नाही आणि तो १०.२० अंशांच्या माफक वाढीसह ८,५४३.०५ अंशांवर स्थिरावला.
मधल्या फळीतील म्हणजे मिड कॅप धाटणीच्या समभागांना मिळालेली जोरदार मागणी हे सोमवारी बाजारात झालेल्या व्यवहाराचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.