25 October 2020

News Flash

बाजार नरमलेलाच!

ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या संभाव्य निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या येथील गुंतवणूकदारांनी भांडवली

सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घसरण

ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या संभाव्य निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या येथील गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराला पुन्हा किरकोळ घसरणीचीच नोंद करण्यास भाग पाडले. ४७.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,७६५.६५ वर तर १६.२० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२०३.७० पर्यंत थांबला.
गेल्या काही सत्रांपासून भांडवली बाजाराचे व्यवहार आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अधिक प्रतिक्रिया देत आहेत. युरो झोनमध्ये राहण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचा निकाल गुरुवारी स्पष्ट होणार असल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी फारसे व्यवहार झाले नाहीत. त्यातही सत्रात २६,८८७ या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या मुंबई निर्देशांकात व्यवहारात २६,६१७.४५ चा तळही अनुभवला गेला. दिवसाची अखेरही मंगळवारप्रमाणेच किरकोळ घसरणीने झाली.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६० व ०.१२ टक्क्याने घसरले. सेन्सेक्समधील १२ समभागांचे मूल्य रोडावले. तर वाहन, दूरसंचार आदी ०.७९ टक्क्यांपर्यंत घसरले. तर मध्यल्या सत्रातील तेजीमुळे आरोग्य निगा, स्थावर मालमत्ता, पोलाद आदी निर्देशांक सत्रअखेरही ०.४२ टक्क्यांपर्यंत वाढले.

‘ब्रेग्झिट’ चिंतेने घसरण!
६ टाटा मोटर्स रु. ४७२.५० ३ २.५८%
६ भारत फोर्ज रु. ७३७.७५ ३ २.३९%
६ हिंदाल्को रु. १२२.०० ३ १.०१%
६ टेक महिंद्र रु. ५३२.२० ३ ०.९४%
६ इन्फोसिस रु. १,१९८.५५ ३ ०.६१
६ टाटा स्टील रु. ३३२ ३ ०.५५%

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2016 7:45 am

Web Title: sensex ends lower for second day on brexit worries
Next Stories
1 ‘श्रीलंका टी बोर्ड’चे मुंबईतील वार्षिक मेळ्यात खास दालन
2 ‘म्हाडा’कडून मुंबईतील ९७२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या घरं कुठे?
3 करचुकवेगिरी तुरुंगवासही घडवील!
Just Now!
X