News Flash

अर्थवेगाच्या तुलनेत निर्देशांक वाढ माफक

सत्रात ८,२०० चा स्तर अनुभवणारा निफ्टी १९.८५ अंश वाढ नोंदवीत ८,१७९.९५ वर स्थिरावला

गेल्या पाच वर्षांच्या सर्वोत्तम प्रवासावर देशाचा आर्थिक विकास दर स्वार होऊनही भांडवली बाजारात मात्र त्याचे बुधवारी अपेक्षित स्वागत झाले नाही. सकाळी किरकोळ वाढीसह सेन्सेक्ससह निफ्टी पुन्हा वाढीच्या दिशेला मार्गस्थ झाले, पण दिवसअखेर. ४५.९७ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,७१३.९३ वर, तर सत्रात ८,२०० चा स्तर अनुभवणारा निफ्टी १९.८५ अंश वाढ नोंदवीत ८,१७९.९५ वर स्थिरावला. सेन्सेक्समधील १४ समभागांचे मूल्य वाढले. यात अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, आयटीसी आदी राहिले, तर स्टेट बँक, भेल, टाटा मोटर्स आदी १६ समभागांना घसरणीला सामोरे जावे लागले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक तेजीत राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 7:47 am

Web Title: sensex ends off days high nifty fails to hold 8200 sbi sinks
Next Stories
1 अर्थव्यवस्थेचा पंचवार्षिक सर्वोत्तम वेग!
2 नफेखोरीने सेन्सेक्सची घसरण
3 पावसाळी अधिवेशनात ‘जीएसटी’ला मंजुरीचा विश्वास; आर्थिक सुधारणांना गती देण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही!
Just Now!
X