News Flash

जागतिक घसरणीचे पडघम;सेन्सेक्स, निफ्टीत सलग घसरण

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू निर्देशांक जवळपास तीन टक्क्यांपर्यंत घसरले.

sensex-bse
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : चीनसह आशियातील प्रमुख निर्देशांकांच्या मोठय़ा घसरणीचे पडसाद मंगळवारी येथेही उमटले. त्यातच गुंतवणूकदारांच्या नफावसुलीची जोड मिळाल्याने सेन्सेक्ससह निफ्टीत जवळपास अध्र्या टक्क्यापर्यंत गटांगळी अनुभवली गेली.

सेन्सेक्स २७३.५१ अंश घसरणीसह ५२,५७८.७६ वर येऊन ठेपला. तर निफ्टी निर्देशांक ७८ अंश घसरणीने १५,७४६.४५ पर्यंत स्थिरावला. चीनद्वारे ई-शिक्षण तसेच अन्य कंपन्यांवरील र्निबधांमुळे आशियातील शांघाय, हाँग काँग येथील भांडवली बाजारात मोठी घसरण नोंदली गेली. तर युरोपीय बाजारांची सुरुवातही घसरणीने झाली. त्याचे नकारात्मक सावट, तसेच गुंतवणूकदारांच्या नफावसुलीचीही घसरगुंडीला जोड मिळाली. सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज्चे सर्वाधिक, तब्बल १०.४४ टक्क्यांपर्यंत मूल्य नुकसान झाले. कंपनीने गेल्या तिमाहीत नोंदवलेल्या ३६ टक्के नफ्यातील घसरणीचा हा परिणाम होता. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक, एचडीएफसी लिमिटेड, महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स आदी ३.२३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टाटा स्टील, बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया आदी वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू निर्देशांक जवळपास तीन टक्क्यांपर्यंत घसरले. तर पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू मात्र घसरणीपासून वाचले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ०.६७ टक्क्यापर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 4:33 am

Web Title: sensex fall 273 points nifty slips below 15750 zws 70
Next Stories
1 केर्न एनर्जीच्या ‘जप्ती’च्या पावलांची सरकारकडून पुष्टी
2 ‘हेतुपुरस्सर कर्जबुडवे’ वाढल्याची अर्थमंत्र्यांची कबुली
3 Glenmark IPO : पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद, ७९ टक्के आयपीओची विक्री!
Just Now!
X