12 November 2019

News Flash

निर्देशांकाची सलग तिसरी घसरण

बुधवारी सेन्सेक्समध्ये १२७.९७ अंश घसरण होत निर्देशांक २५,१०१.७३ वर स्थिरावला.

सेन्सेक्स २५ हजारांच्या काठावर

सलग तिसऱ्या व्यवहारात घसरताना सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांच्या काठावर आला. जागतिक बाजारातील अस्वस्थता आणि येथील कंपन्यांच्या तिमाही निकालाची चिंता यामुळे मुंबई निर्देशांक आता गेल्या तीन आठवडय़ांच्या तळात विसावला आहे.

बुधवारी सेन्सेक्समध्ये १२७.९७ अंश घसरण होत निर्देशांक २५,१०१.७३ वर स्थिरावला. तर ४०.४५ अंश घसरणीसह निफ्टी ७,७०६.५५ पर्यंत राहिला. गेल्या सलग तीन व्यवहारांत सेन्सेक्सने ५०४.८९ अंशांचे नुकसान सोसले आहे.

बुधवारच्या सत्राची सुरुवात सेन्सेक्सने २५२१०.८७ या किमान स्तरावर झाली. व्यवहारात तो २५२४५.७० पर्यंत झेपावला. तर व्यवहाराअखेर बंद होणारा त्याचा सत्राचा तळ होता. सेन्सेक्सचा बुधवारचा बंद स्तर हा ११ एप्रिलनंतरचा किमान नोंदला गेला.

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स अ‍ॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा समभाग सर्वाधिक जवळपास १२ टक्क्यांनी आपटला. आरामदायी वाहन गटामार्फत निराशाजनक वाहन विक्री नोंदविल्याने टाटा मोटर्सचा समभाग ६.७६ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य घसरले.

प्रमुख निर्देशांकासह मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही एक टक्क्यापर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक ३.४९ टक्क्यांनी आपटला. सोबतच वाहन, दूरसंचार, ऊर्जा, तेल व वायू निर्देशांकांमध्येही घसरण नोंदली गेली.

घसरता रुपया,तेल दराचीही धास्ती

परकी चलनविनिमय मंचावर बुधवारच्या व्यवहारा दरम्यान डॉलरच्या तुलनेत १० पैशांपर्यंत घसरलेल्या रुपयाचीही बाजारात नकारात्मक छाया राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेल दरातील कमालीचा चढ-उतारचाही बाजारावर विपरीत परिणाम झाला.ू

First Published on May 5, 2016 6:30 am

Web Title: sensex fall down 2