बुधवारी सलग पाच दिवसांतील घसरण मोडीत काढणारा भांडवली बाजार गुरुवारी पुन्हा तोच प्रवास करता झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६.०१ अंश घसरणीने २०,७१३.३७ पर्यंत घसरला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ६.२५ अंश घट होऊन ६,१६८.३५ वर स्थिरावला.
भांडवली बाजारात बुधवारी किरकोळ वाढ होताना २०१४ मधील पहिली तेजी नोंदली गेली होती. गुरुवारी मात्र बाजारात गुंतवणूकदारांकडून नफेखोरीचे धोरण अवलंबिले गेले. बुधवारच्या तुलनेत व्यवहारात १२५ अंशांपर्यंत घट नोंदविणारा सेन्सेक्स दिवसभरात २०,६५२.६९ पर्यंत खाली आला.
सेन्सेक्समधील १८ कंपनी समभाग घसरले. वधारणाऱ्या समभागांमध्ये ओएनजीसी, सेसा स्टरलाइट, इन्फोसिस, रिलायन्ससारख्या निवडक समभागांचे मूल्य वधारले. घसरणीत बांधकाम निर्देशांक सर्वाधिक २.३१ टक्क्यांसह आपटला.