मुंबई : निर्देशांकातील आघाडीच्या समभागांकरिता मागणी नोंदविताना गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराला बुधवारी त्यांच्या वरच्या टप्प्यापासून खाली खेचले. एकाच व्यवहारात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारच्या तुलनेत प्रत्येकी एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदविली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात ४२१.८२ अंश घसरणीने ३८ हजारांच्या काठावर, ३८,०७१.१३ वर स्थिरावला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात जवळपास शतकी, ९७.७० अंश घसरण होऊन निफ्टी ११,२०२.८५ पर्यंत खाली आला.

सत्रात ज्या समभागांच्या जोरावर गुंतवणूकदारांनी बुधवारी नफे खोरीचे धोरण अनुसरले ते रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकसारखे आघाडीचे समभाग व्यवहारअखेर मात्र घसरले. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी, टेक महिंद्रदेखील जवळपास ४ टक्क्यांपर्यंत खाली आले.

इंडसइंड बँक, टाटा स्टील, सन फार्मा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो आदी मात्र ४.५४ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, पोलाद, दूरसंचार वाढले. तर ऊर्जा, वाहन, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू आदी ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प, स्मॉल कॅ प प्रत्येकी अर्ध्या टक्क्याहून अधिक फरकाने घसरले.

अमेरिके च्या फे डरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरणाबाबतच्या उत्सुकतेने आशियाई बाजारात मात्र संमिश्र वातावरण राहिले.