News Flash

बाजार विक्रीने बेजार!

सलग तिसऱ्या घसरणीतून ‘सेन्सेक्स’चे १,४४४ अंशांनी पतन

(संग्रहित छायाचित्र)

वरच्या स्तरावर पोहोचलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांवरील विक्रीचा मारा वाढल्याने, भांडवली बाजाराला सलग तिसऱ्या दिवशी मोठी निर्देशांक घसरण पाहावी लागली. सोमवारच्या भयंकर अस्थिर व्यवहारात ‘सेन्सेक्स’ ५३०.९५ अंशांनी गडगडून ४८,३४७.५९ वर स्थिरावला.

गेल्या आठवडय़ात गुरुवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ने ५० हजारांच्या ऐतिहासिक आणि भावनिकदृष्टय़ाही लक्षणीय पातळीला स्पर्श केला, परंतु बाजाराची दिवसाची अखेर मात्र घसरणीने झाली. त्यासह नंतर दोन असे तीन व्यवहारांमध्ये मिळून सेन्सेक्सने १,४४४.५३ अंश म्हणजे जवळपास तीन टक्क्य़ांची तूट सोसली आहे, तर निफ्टीने या तीन दिवसांत ४०५.८० अंश (२.७७ टक्क्यांचे) नुकसान सोसले आहे. सोमवारच्या व्यवहाराची अखेर निफ्टीने १३३ अंशांच्या घसरगुंडीने १४,२३८.९० या पातळीवर केली.

उल्लेखनीय म्हणजे सोमवारच्या व्यवहारांना सेन्सेक्सने ३७५ अंशांच्या दमदार उसळीसह ४९,२६३.१५ या पातळीवरून केली होती; परंतु बाजाराचा हा सकारात्मक कल पुढे सुरू झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे पालटला. दिवसातील या उच्चांकापासून जवळपास १००० अंश खाली म्हणजे ४८,२७० पर्यंत सेन्सेक्सची घसरगुंडी उडाल्याचेही एका प्रसंगी उडाल्याचे दिसून आले. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग घसरणीत राहिले.

‘टीसीएस’ला मौल्यवानतेचे कोंदण!

मुंबई : टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने सोमवारच्या व्यवहारात, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला पिछाडीवर टाकून बाजार भांडवलदृष्टय़ा भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा बहुमान पुन्हा एकदा मिळविला. दुपारच्या व्यवहारात टीसीएसच्या बाजार भांडवलाने १७० अब्ज अमेरिकी डॉलपर्यंत मजल मारली आणि न्यूयॉर्क शेअर बाजारात सूचिबद्ध अ‍ॅक्सेन्च्युअरला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान माहिती-तंत्रज्ञान कंपनी बनण्याचीही किमया साधली. मात्र पुढे सुरू झालेल्या विक्रीमुळे अ‍ॅक्सेन्चुअरच्या १६८ अब्ज डॉलर बाजार भांडवलाच्या तुलनेत, टीसीएसचे बाजार भांडवल किंचित खाली १६७ अब्ज डॉलरवर दिवसअखेर स्थिरावलेले दिसले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील ५.३६ टक्के घसरणीने भागधारकांच्या संपत्तीला तब्बल ४ अब्ज डॉलरचा फटका बसला आणि कंपनीचे बाजारातील अग्रस्थानही टीसीएसकडून हिसकावले गेले.

अस्थिरतेचे ग्रहण कशामुळे?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्ह मंगळवारपासून सुरू होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निर्णयाकडे जागतिक भांडवली बाजाराच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, पुढील आठवडय़ात सोमवारी भारताचा २०२१-२२ सालचा अर्थसंकल्प येऊ घातला आहे. अर्थव्यवस्थेच्या आगामी दिशा देणाऱ्या या महत्त्वाच्या धोरणांविषयी अनिश्चितता जोवर संपुष्टात येत नाही, तोवर गेल्या तीन दिवसांत दिसली तशी भीतीदायी अस्थिरता बाजारात कायम राहील, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:22 am

Web Title: sensex fell by 1444 points for the third straight fall abn 97
Next Stories
1 राणा कपूर यांना जामिन देण्यास उच्च न्यायालयाचाही नकार
2 उद्योग-गुंतवणुकीच्या ‘उत्सवीकरणा’ला आता पायबंद 
3 ‘ऑयनॉक्स’ची १३५ कोटींची गुंतवणूक
Just Now!
X