25 November 2020

News Flash

मुहूर्ताला आशेची तोरणे; सेन्सेक्समध्ये १९२ अंशांची वाढ

परंपरेनुसार आणि भावनिक महत्त्व असलेले मुहूर्ताचे सौदे बाजारात सायंकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत झाले.

(संग्रहित छायाचित्र)

दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर, नव्या संवत्सर २०७६ च्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळी भांडवली बाजारात झालेल्या तासाभराच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांचा सकारात्मक कल राहिला. उल्लेखनीय बाब म्हणजे सरलेल्या संवत्सरात सपाटून मार खाणाऱ्या तळाच्या व मधल्या फळीतील अर्थात स्मॉल व मिड कॅप समभागांना मुहूर्ताच्या व्यवहारात मोठी मागणी व मूल्यवृद्धीसह लकाकी दिसून आली.

परंपरेनुसार आणि भावनिक महत्त्व असलेले मुहूर्ताचे सौदे बाजारात सायंकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत झाले. अलीकडचा सकारात्मक कल कायम राखत, रविवारच्या या विशेष व्यवहारात बाजारात खरेदीदारांचा बोलबाला दिसून आला. शुक्रवारच्या बंद स्तरावरून सेन्सेक्सने १९२.१४ (०.४९ टक्के) अशांची कमाई करत ३९,२५०.२० अशी पातळी गाठली, तर निफ्टी ४३.३० अंशांच्या (०.३७) वाढीसह ११,६२७.२० वर पोहोचला. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.७ आणि १.२ टक्क्यांच्या दमदार वाढीसह झेपावताना दिसले. बाजारात प्रत्येक घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत, तीन समभागांमध्ये मूल्य वाढ दिसून आली. आगामी वर्ष हे बाजारासाठी आणखी दमदार राहील, अशा बाजारभावनेतील आशावादी आणि उत्साही बदलाचेच हे द्योतक आहे, असे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक रेली यांनी व्यक्त केले.

सप्टेंबर तिमाहीत तोटय़ाच्या प्रमाणात घसघशीत ७९ टक्क्यांची घट दाखविणाऱ्या टाटा मोटर्सच्या समभागाने तब्बल १८ टक्क्यांची साधलेली मूल्यवाढ हे रविवारच्या व्यवहाराचे वैशिष्टय़ ठरले. मागील वर्षांतील याच तिमाहीत कंपनीला १,०४८ कोटींचा तोटा झाला होता. जेएलआर वाहनांची चीनमधील सुधारलेली विक्रीही टाटा मोटर्सकडे खरेदीदार आकर्षति करण्यास उपकारक ठरली. मिहद्र अँड मिहद्रचा समभागही दमदार वधारला. परिणामी, वाहन उद्योग निर्देशांक १.४६ टक्क्यांची वाढ नोंदविणारा ठरला.

केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टाकलेली पावले आणि कंपनी करात कपातीसारख्या हाती घेतलेल्या आíथक सुधारणा येत्या काळात पुढचे महत्त्वाचे टोक गाठतील, अशी आशा आहे. परिणामी, परकीय गुंतवणूकदार संस्थांचाही बाजाराकडे पाहण्याचा कल बदलत आहे. त्यामुळे आगामी कालावधी गुंतवणुकीसाठी खूपच उज्ज्वल आहे, अशी प्रतिक्रिया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सíव्हसेसचे मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केली.

रविवारच्या व्यवहारात, सातत्याने गटांगळ्या खाणाऱ्या येस बँक, वेदान्त, इन्फोसिसच्या समभागांनीही मोठी कमाई केली. दूरसंचार क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचा अपवाद वगळता, अन्य सर्व उद्योग क्षेत्रात सकारात्मक वाढ दिसून आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:56 am

Web Title: sensex increase 194 points abn 97
Next Stories
1 तीन दशकात पहिल्यांदाच सोन्याची विक्री? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण
2 धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सोन्या-चांदीच्या खरेदीला झळाळी
3 दिवाळीचा खरेदी उत्साह यंदा फिका
Just Now!
X