26 November 2020

News Flash

‘सेन्सेक्स’ची ४७७ अंशांनी झेप

चलन बाजारात रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी मजबूत होऊन, ते दिवसअखेर ७४.७६ या पातळीवर स्थिरावले.

संग्रहित छायाचित्र

मध्यंतरी सलग चार दिवसांच्या व्यवहारातील अटकावानंतर भांडवली बाजारातील तेजीचा क्रम पुन्हा सुरू झाला आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घेतलेल्या मुसंडीत, ‘सेन्सेक्स’ने ४७७.५४ अंशांची कमाई करीत ३८,५२८.३२ या पातळीवर दिवसअखेरी विश्राम घेतला.

बँक क्षेत्रातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांबरोबरीनेच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची खरेदी आणि त्यांच्या भावातील वाढीचे निर्देशांकाच्या मंगळवारच्या मोठय़ा मुसंडीत सर्वाधिक योगदान राहिले. निफ्टी या अन्य प्रमुख निर्देशांकानेही सोमवारच्या तुलनेत १३८.२५ अंशांची भर घालत, दिवसअखेरीला व्यवहार थंडावले तेव्हा ११,३८५.३५ ही पातळी कमावली. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही निर्देशांकांचा हा मागील पाच महिन्यांमधील उच्चांकी स्तर आहे.

चलन बाजारात रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी मजबूत होऊन, ते दिवसअखेर ७४.७६ या पातळीवर स्थिरावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 12:11 am

Web Title: sensex jumps 477 points abn 97
Next Stories
1 तिमाहीत अर्थव्यवस्थेत १६.५ टक्क्यांनी घसरण
2 उद्यमशील, उद्य‘मी’ : कर्मसिद्धांत आणि उद्योजक
3 टीजेएसबी बँकेचा एकूण व्यवसाय १७,००० कोटींपुढे
Just Now!
X