मुंबई : भांडवली बाजारातील अस्थिरतेला सप्ताहअखेर रिलायन्सने भक्कम आधार दिला. भारताच्या विदेश स्तरावर चिंता कायम असताना समूहाने विदेशातून के लेल्या निधी उभारणीचे जोरदार स्वागत गुंतवणूकदारांनी के ले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी थेट ५२३.६८ अंशांनी झेपावत ३४,७३१.७३ वर पोहोचला. व्यवहारात त्याने ६४०.३२ अंशांची उसळी नोंदविली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५२.७५ अंशांनी वाढून १०,२४४.४० पर्यंत पोहोचला. गुरुवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांनी पुढे गेले. असे करताना मुंबई निर्देशांक ३४,७०० च्या, तर निफ्टी १० हजारांच्या पुढे गेला.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक आदी मूल्यवाढीत अग्रणी राहिले, तर इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिस आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, ऊर्जा, तेल व वायू, दूरसंचार आदी ६.३६ टक्क्यांपर्यंत वाढले, तर माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकावर विक्री दबाव राहिला.

साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांक ९५०.८५ अंशांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराने २७१.५० अंशांची वाढ नोंदविली आहे.