12 August 2020

News Flash

तेजीवाले पुन्हा सक्रिय

‘सेन्सेक्स’ची ५५८ अंश झेप

संग्रहित छायाचित्र

सलग दोन सत्रांमध्ये सुरू राहिलेली घसरणीला बांध घालत, भांडवली बाजारात मंगळवारी तेजीवाले पुन्हा सक्रिय झालेले दिसून आले. परिणामी ‘सेन्सेक्स’ला ५५८ अंशांची झेप घेता आली, तर निफ्टी निर्देशांकाला ११,३०० अंशांचा अवघड टप्पा ओलांडता आला. माहिती-तंत्रज्ञान, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांची कामगिरी चमकदार राहिली.

करोना आजारसाथीसंबंधी चिंता पूर्णपणे बाजूला सारून, मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवातच सेन्सेक्सने ३८ हजार अंशांपुढे मजल मारत केली आणि ३८,५५५ हा दिवसांतील उच्चांकी टप्पा निर्देशांकाने मध्यान्हीच्या व्यवहारात गाठला. दिवसाची अखेर त्याने याच जवळपास म्हणजेच सोमवारच्या तुलनेत ५५८.२२ अंशांच्या कमाईसह ३८,४९२.९५ या पातळीवर केली. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी निर्देशांकही सोमवारच्या तुलनेत १६८.७५ अंशांच्या सरशीसह ११,३००.५५ या पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये अल्ट्राटेक सीमेंट अपेक्षेपेक्षा चांगल्या नोंदविलेल्या तिमाही निकालांमुळे ७.१७ अंशांच्या मुसंडीसह सर्वाधिक कमाई करणारा समभाग ठरला. बाजारात खरेदीचा मूड जबरदस्त होता, परिणामी सेन्सेक्समधील ३० पैकी आयसीआयसीआय बँक, नेस्ले, एशियन पेंट्स, ओएनजीसी आणि आयटीसी या केवळ पाच समभागात माफक प्रमाणात घसरण दिसून आली.

सर्वच उद्योग क्षेत्रवार निर्देशांक मंगळवारच्या व्यवहारात सकारात्मक राहिले. बीएसई स्मॉल कॅप, मिड कॅप यांची कामगिरी मात्र प्रमुख निर्देशांकाच्या दीड टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत अनुक्रमे ०.६१ टक्के आणि ०.७६ टक्के अशी काहीशी कमजोर राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:13 am

Web Title: sensex jumps 558 points abn 97
Next Stories
1 संकटात लिक्विड फंडांचे आकर्षण
2 निर्देशांक घसरण सप्ताहारंभी कायम
3 बँक बुडीत कर्जे विक्रमी टप्प्यावर?
Just Now!
X