* चार राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळण्याच्या सर्वेक्षणांच्या निकालाने भांडवली बाजार प्रेरित झाला आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया सव्वा महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. एकूणच गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साह दिसून येत आहे.
रघु कुमार, सह संस्थापक, आरकेएसव्ही

* सर्वेक्षणाचे कौल भांडवली बाजारासाठी सकारात्मक राहिला असून २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकांतही स्थिर सरकारची अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांनी व्यक्त केल्याचे गुरुवारच्या व्यवहारातून दिसते.
बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच

* आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात बहुमतातील सरकार येईल, असा आशावाद आतापासूनच दिसतो आहे. यामुळे देशाच्या एकूण विकासाबरोबरच अर्थकेंद्रही सकारात्मक वाटचाल करताना आपण पाहतो आहोत.
नोमुरा

* विधानसभेच्या निवडणुकांनंतरच्या जनमत चाचण्यांवर शेअर बाजार प्रभावित झाला हे नाकारता येणार नाही. या चार राज्यांत भाजपचे सरकार येईल, हा मतदानोत्तर कल गुंतवणूकदारांना गुरुवारी अधिक खरेदी करण्यास मदतीचा ठरला.
जिग्नेश चौधरी, विश्लेषन प्रमुख, वेरासिटी ब्रोकिंग सव्‍‌र्हिसेस