सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सोमवारी हा त्याच्या गेल्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला. एकाच व्यवहारातील २३८.९८ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २६,२६२.२७ पर्यंत घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सोमवारी ५९.४५ अंश आपटी नोंदविली गेल्याने प्रमुख निर्देशांक ८,१०० च्याही खाली येत ८,०६३.९० वर स्थिरावला.
रुपया सप्ताह तळात
नव्या आठवडय़ाची सुरुवात मोठय़ा घसरणीने करणाऱ्या रुपयाने सोमवारी सप्ताहातील नवा तळ गाठला. डॉलरच्या तुलनेत एकाच व्यवहारात ३८ पैशांची आपटी नोंदवित रुपया परकी चलन विनिमय मंचावर ६७.१४ या त्याच्या ३ जूननंतरच्या तळात विसावला.
सोने ३० हजार पल्याड
सलग चौथ्या सत्रात दरांची तेजी नोंदविताना सोने सोमवारी तोळ्यासाठी ३० हजार रुपयांपल्याड पोहोचले. एकाच व्यवहारात पिवळ्या धातूमध्ये एकदम १० ग्रॅमसाठी जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या किलोचा भाव सोमवारी ४१,५०० पुढे गेला.